प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी वंचितांना सत्तेपासून दूर ठेवतेयं : रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडी पक्ष हा राज्यातील वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारा आहे, असे म्हणत रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना लक्ष्य केले आहे. एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला आहे.

वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यात एकमेकांवर होणारे आरोप – प्रत्यारोप हे सर्वश्रुत आहेत. यावरूनचं रामदास आठवले यांनी वंचित आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी रामदास आठवले यांनी या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे १० जागांची मागणी केली होती. मात्र महायुतीकडून आठवले यांच्या रिपाई पक्षाला ५ जागा देण्यात आल्या आहेत.

रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात महायुती बाबतही भाष्य केले आहे. महायुतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन झाले आहे. तसेच रिपब्लिकन पक्ष सत्तेत राहू शकला. त्यामुळे आम्ही काही तडजोडी केल्या आहेत आणि आम्ही एकत्र आहोत. आगामी निवडणुकीत महायुती किमान 240 ते 245 जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या