मोठी बातमी : उद्याच्या मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

prakash aambedkar - sambhaji chahtrapti

कोल्हापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

उद्या कोल्हापूरमध्ये पहिला मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आता वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सुद्धा सहभागी होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणातली ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपण या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे नवीन आघाडीचा फॉर्म्युला तयार केला जात असल्याची चर्चा रंगली होती. आता खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे चिन्ह आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP