fbpx

प्रकाश आंबेडकर लोकसभेला सोलापुरातून लढणार

prakash-ambedkar

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीत ऍड.प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी सातारा येथील सभेत केली आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर हे अकोल्याचीही जागा कायम ठेवत सोलापूर मधून लढणार आहेत. ज्यांच्या हृदयाचे ठोके वाढतील ते वाढोत पण हा निर्णय झाला आहे. बाळासाहेबांनी दोन्ही मतदार संघात प्रचाराला येऊ नये आम्ही जीवाचे रान करून त्यांना विक्रमी मताने निवडून आणू असेही यावेळी लक्ष्मण माने म्हणाले.

आगामी काळात सोलापुरातून निवडणुक लढवण्याच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदेच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे हेही सोलापुरमधून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत.