राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळेंना उमेदवारी मिळाल्यास आघाडी करणार नाही – प्रकाश आंबेडकर

prakash aambedkar

उस्मानाबाद : आपण दलितोत्तर राजकारण करू नये यासाठी आपल्यावर स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षातील नेतेच दबाव आणत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हंटलं आहे. तसेच स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे पक्षच सध्या घराणेशाहीला सर्वात जास्त प्राधान्य देत आहेत. जर सुप्रिया सुळे, अजित पवार आणि राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षांनी उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील धनगर, माळी, कोळी अशा प्रत्येक जातीच्या उमेदवारांना लोकसभेसाठी किमान दोन जागा द्याव्यात, असा प्रस्ताव आपण सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांसमोर मांडला आहे. अद्याप आपणास कोणीच प्रतिसाद दिलेला नाही. समाजातील वंचित घटकांना मागील ७० वर्षांत देशाच्या सभागृहात जाण्याची संधी मिळालेली नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) संविधानविरोधी धोरणांना रोखायचे असेल तर सर्व वंचित घटकांना समान संधी द्यायला हवी. केंद्र आणि राज्य सरकारचा दहशत निर्माण करणे हा धोरणात्मक कार्यक्रम सध्या सुरू आहे. मुक्त विचार करणाऱ्यांना दबावाखाली घेतले जात आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांप्रमाणे यांना भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून अधिकारी वर्गाला धमकावून पसा गोळा केला जात असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.

खडसे नरमले : गिरीश महाजनांच्या नेतृत्वात काम करण्यास खडसे तयार!

संविधान बदलण्याचा काँग्रेस – भाजपचा डाव – आंबेडकर