fbpx

प्रकाश आंबेडकर हेलिकॉप्टरमधून फिरतात, एवढा पैसा आला कोठून – चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपली वेगळी चूल मांडली आहे, भाजप आणि कॉंग्रेसला पर्याय देण्यासाठी एमआयएम, भारिप बहुजन महासंघ तसेच इतर छोटे पक्ष वंचित बहूजन आघाडीमध्ये एकत्र आले आहेत. मात्र ही आघाडी विरोधकांचे मतविभाजन करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मुर्तीजापुर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर हेलिकॉप्टरमधून फिरतात. लाखो रुपये खर्चून सभा घेतात, मग त्यांच्याकडे एवढा पैसा आला कोठून, त्यांना आर्थिक रसद कोण पुरवत आहे, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. आंबेडकर अप्रत्यक्षरीत्या कोणाला मदत करत आहेत, हे जनतेने ओळखायला हवं, असं देखील ते म्हणाले.

भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, मात्र ते पूर्ण केले नाही, त्यामुळे तीन राज्यात त्यांची सत्ता गेली. लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला १६० चा आकडा पार करता येणार नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.