मोहन भागवतांनी समरसतेची पिपाणी वाजवणं बंद करावं : प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar vs mohan bhagwat

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सद्या त्यांच्या प्रहारांमुळे चर्चेत आहेत. मंदिरं खुली करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारविरोधात पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात प्रवेश करून आंदोलन केलं होतं. तर, मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलं असतानाच त्यांनी खासदार संभाजीराजे व खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खरमरीत टीका केली होती. यानंतर त्यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला होता.

साताऱ्यात त्यांच्यावरीधात तक्रार देखील देण्यात आली होती. आता, प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘मोहन भागवत जी, आपल्या उद्बोधनात सारखं-सारखं समरसतेची पिपाणी वाजवणं बंद करावं. कधी आपल्या शब्दकोशातील या शब्दाचा अर्थ सार्वजनिक करण्याचं धाडस आपण करून दाखवावं. आरक्षणाची गरज असे पर्यंत ते ठेवलं पाहिजे असं म्हणत मोठ्या चतुराईने तुम्ही आरक्षण संपवायचं कारस्थान करत आहात.’ असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे.

तर, ‘तुम्ही आणि तुमच्या समरसतेचं ढोंग जग-जाहीर आहे. मागील शंभर वर्षात जातीभेद, अत्याचार, कुंठित विचार अन्यायकारक व्यवस्था समाप्त करायची होती पण आपण थेट आरक्षणच संपवायला चालला आहात. समतावादी समाजाच्या स्थापनेमागे तुमचं योगदान फक्त आरक्षणाला विरोध हे आहे.याशिवाय तुमच्याकडे सांगायला, करायला काहीही नाही आणि हेच तुमच्या वैचारिक शून्यतेचा आणि मानसिक दिवाळखोरीचा मजबूत पुरावा आहे. “समरसता : माझे पोट भरते, जरी इतरला तळमळत असते” ‘ अशी बोचरी टीका आंबेडकरांनी मोहन भागवत यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या:-