पुरग्रस्त ‘ब्रम्हनाळ’ गाव प्रकाश आंबेडकर यांनी घेतले दत्तक

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक गाव दत्तक घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे ब्रम्हनाळ गावावर शोककळा पसरलेली आहे. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.

ब्रम्हनाळ गावातील ७०० कुंटुंब, ३५०० लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावक-यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गांव देत आहोत असं जाहीर केले आहे.

ब्रम्हनाळ गावाला मिळणाऱ्या सुविधा

1. गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील.

2. 700 कुंटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था केली जाईल.

3. गावातील विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल.

4. गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल.

5. गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविले जातील.

6. गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

महत्वाच्या बातम्या