fbpx

पंतप्रधानपदासाठी आंबेडकरांनी दिली ‘या’ बड्या नेत्याला पसंती !

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर देशभरात चर्चा सुरु झाली आहे. सत्ताधारी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमत आहे. तर विरोधी पक्षांमध्ये अनेक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले पहायला मिळत आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू , मायावती अशी भलीमोठी यादी पहायला मिळत आहे. यावर आता डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान होण्यासाठी अनेक नेते इच्छुक असले तरीही लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.तर शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी लायक मानत नाही असं म्हणत पवारांना चिमटा काढला आहे. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत आंबेडकरांनी केले आहे.