प्रकाश आंबेडकर यांनी तमाशातील राजा होऊ नये- रामदास आठवले

रामदास आठवले

सांगली: प्रकाश आंबेडकर यांनी तमाशातील राजा होऊन चालणार नाही त्यांनी राजकारणातील राजा होणे गरजेचे आहे. असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. सांगलीत आयोजित कार्यक्रमात आठवले बोलत होते.

कोरेगाव-भीमा दंगलीनंतर प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. दलित संघटनांचा मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार, असे म्हणत, प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाना साधला होता. यामुळे रामदास आठवलेंनी हे वक्तव्य केल्याचे समजते.

‘पीएनबी’ मुद्यावर बोलतांना आठवले म्हणाले, नीरव मोदी हा बँकांना फसवतो आणि पळून जातो; मात्र गरजू गरीब लोकांना बँका कर्ज देताना टाळाटाळ करतात हे बरोबर नाही. अण्णाभाऊ साठे आणि महात्मा फुले महामंडळातील मंजूर कर्ज प्रकरणांची संख्या कमी आहे. ज्या बँका कर्ज देताना अडवणूक करतील त्या बँकांवर कारवाई करणार असेही ते म्हणाले.Loading…
Loading...