‘सेना-भाजपला हटविण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांचे नेतृत्व आंबेडकरांनी करावे’

रायगड : वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का देणारे प्रा.लक्ष्मण माने हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. भाजप – शिवसेना सत्तेला राज्याच्या सत्तेतून बाजूला सारण्यासाठी सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न मी करत आहे. या सर्व पुरोगामी संघटनांचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे, अशी माझी विनंती माने यांनी केली आहे.

Loading...

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मण माने हे अलिबाग मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी माने म्हणाले, भाजप शिवसेना पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी पक्ष व संघटनेने एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी शेकापने या आघाडीत सामील व्हावे, अशी भूमिका असून त्याला जयंत पाटील यांनी दुजोरा दिला असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.Loading…


Loading…

Loading...