Share

Prakash Ambedkar | “ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार?”; प्रकाश आंबेडकर म्हणाले,

Prakash Ambedkar | मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले, “आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही. आमचे काही ऐतिहासिक मुद्दे आहेत. वैदिक हिंदू समाज रचनेबाबतं आमचं भाजपशी भांडण आहे. त्यावर त्यांनी आधी उत्तर दिलं पाहिजे. मग आमच्याकडे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय राहत नाही.”

“महाविकास आघाडीचं काय करायचं हे त्यांचं ठरत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचं काय होईल हे मला दिसत नाही.” काँग्रेसची एक टीम येऊन गेली. त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली. शिवसेनेचे काही नेते मला भेटून गेले. पण 20 तारखेच्या कार्यक्रमानिमित्त भेटून गेले. त्यांच्यासोबत राजकीय भेट झालेली नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

“नाना पटोलेंनी काँग्रेस एकटं लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहात की आमच्याशी प्रत्येकजण वेगळं बोलणार आहे हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. पण अद्याप महाविकास आघाडीच्या घटकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,” अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिलीय.

दरम्यान, तारखेचा पोर्टल उद्घाटनाचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी आधीच ठरला होता. त्यासाठी होकार दिला असून, हजर राहणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Prakash Ambedkar | मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे (Eknath …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now