मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने नवी राजकीय वळणे येत आहेत. आधी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणाऱ्या घोषणेने सर्वांनाच चकित केले. नंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी न झाल्यानेही सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र फडणवीस सरकारमध्ये सामील न होण्याचे बोलताच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा अॅक्टीव्ह झाले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सतेते सहभागी होण्याचे आदेश दिले. त्यामुळे फडणवीस आणि केंद्र यांच्यातील नाराजी उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
“चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
काल शपथविधीनंतर देखील प्रकाश आंबेडक यांनी ट्विट केले होते. बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिंदे म्हणाले की, त्यांच्या या निर्णयाने मोठ्या मनाचे नवे उदाहरण राज्यातील व देशातील जनतेला पाहायला मिळाले.
मोदी-शहा-नड्डा यांचे विशेष आभार
शिंदे यांनी एका वृत्तवाहीणीला सांगितले की, “सर्वाधिक संख्या असलेला पक्ष मुख्यमंत्रिपदावर दावा करतो. परंतु या प्रकरणात, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मोठे योगदान दिले. मुख्यमंत्रिपदी मोठं मन दाखवून शिवसैनिकाला संधी दिली.”
शिंदे म्हणाले की, फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व केल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री म्हणून पूर्वीचा कार्यकाळ उपयोगी पडेल. फडणवीस हे त्यांच्या भाजपमधील वरिष्ठांच्या सूचनेमुळे या मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. याचा मला आनंद आहे कारण त्यांचा अनुभव राज्यातील विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगी पडेल,” असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<