संघ मोदींना बकरा बनवत आहे – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वाटत नसल्याने संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बकरा बनविण्यास सुरूवात केली असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आपल्या विधानाला पुष्टी देतांना ज्येष्ठ स्वयंसेवक भय्याजी जोशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांचे नाव न घेता सत्तेत असणाऱ्यांना तेच सर्वेसर्वा असल्याचे वाटते, तसेच सध्या राजा कोण, हे सर्वांना माहीत असल्याचे विधान केले होते, याकडे आंबेडकरांनी लक्ष वेधले.

आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आंबेडकर यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक येथे घेतली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नोटबंदीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. तसेच सर्जिकल स्ट्राइकची सत्यता वादग्रस्त ठरल्याने संघाने हात झटकले असावेत आणी मोदी यांनाच सर्वस्वी जबाबदार धरून आपली प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

Gadgil