व्यापाऱ्यांंकडे अजूनही जुन्या नोटा, आमचे सरकार आल्यावर नोटा बदलून देऊ – आंबेडकर

Prakash-Ambedkar

नांदेड: मोदी सरकारने नोटबंदी लागू केल्यानंतर अनेक उद्योग ठप्प झाले आहेत, थोड्या प्रमाणात जुन्या नोटा बदलून मिळाल्या मात्र आजही व्यापाऱ्यांकडे जुन्या नोटांचा साठा आहे. वंचित बहुजन आघाडीचे सरकार आल्यास या नोटा बदलून देऊ, असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे, हिंगोली लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते.

आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ पण चोरांचे सरकार पुन्हा येणार नाही, याची खबरदारी मतदारांनी घ्यायला हवी, पंतप्रधान हा जनतेची उत्तरे देणारा असावा, मात्र मोदी हे आपल्या मनकी बात लोकांवर थोपवत आहेत, अशी टीका यावेळी आंबेडकर केली .

दरम्यान, देशाला कोणा चौकीदाराची नाही, तर अभ्यासू पंतप्रधानाची गरज असल्याचं आंबेडकर म्हणाले. नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे असून अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप यावेळी केला आहे.