35 अ हटवल्यास देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, आंबेडकरांचा इशारा

नवी दिल्ली : मोदी सरकारनं राज्यसभेत आज मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं आहे. त्यानुसार कलम 370मधील काही कलमं वगळण्यात येणार आहेत, असं अमित शाह यांनी संसदेत सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

या घडामोडी घडत असताना आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी थयथयाट सुरु केला असून संसदेत गोधळ घालायला सुरुवात केली आहे. या प्रस्तावाला विरोधकांकडन कडाडून विरोध करण्यात येत आहे. अमित शाह राज्यसभेत प्रस्ताव मांडत असताना विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली तसेच हे विधेयक मांडण्यास विरोध करण्यात आला.

दरम्यान, काल पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर या संदर्भात मत व्यक्त केले होते. काश्मिरी लोकांना राज्यघटनेतील 35 A व्या कलमाने मिळालेले संविधानिक संरक्षण काढून टाकण्याच्या गोष्टी सुरू आहेत. याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. काश्मिरातील सैन्य आहे. तो पर्यंत तेथील जनता शांत राहिल. सैन्य मागे घेतल्यावर अथवा लढण्याची ताकद मिळताच जनता पुन्हा सैन्यासोबत लढेल असा इशारा  प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

सरकारने काश्मिरी जनतेसोबत चर्चा करावी. असा सल्ला केंद्रसरकारला दिला. लोकांनी मतदान करून पंतप्रधानपदी बसवलं म्हणजे देशाचे नाही. म्हणून यावर निर्णय घेऊ शकत नाही. देशातील जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवावा लागेल. अशी टीका आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, भारताच्या इतिहासातील हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याची शिफारस केंद्र सरकारने केली आहे. हा प्रस्ताव मांडताना गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला आहे.

आरपीआयला हव्यात एवढ्या जागा, आठवलेंनी करून दिली आठवण

पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण; प्रकाश आंबेडकरांची भाजप-सेनेवर टीका

#जम्मू काश्मीर : आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील ‘काळा दिवस’ : मेहबूबा मुफ्ती