औरंगाबादः एमआयएमचा बंद लिफाफा प्रकाश आंबेडकरांना सुर्पूद

prakash aambedkar

औरंगाबादः वंचित बहुजन आणि एमआयएम यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने या दोन्ही पक्षांमध्ये कुरुबुरी वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे असतांना एमआयएमच्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकरांकडून अद्याप कुठलाच निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आज एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंद लिफाफ्यातील पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकरांकडे सुर्पूद केले आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात जाऊन कादरी यांनी आंबेडकरांची भेट घेतली.

गेल्या महिन्यात दिल्ली येथे ओवेसी, आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांच्यात बैठक झाली होती. त्यावेळी एमआयएमने 96 जागांचा प्रस्ताव दिला होता. पैकी 76 जागांवर आमचे उमेदवार निवडूण येऊ शकतात असा दावा देखील केला होता. त्यावर पक्षाची कोअर कमिटी नेमूण निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होत. परंतु जागा वाटपासंदर्भात अद्याप कोअर कमिटीकडून कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर एमआयएम वंचित बहुजन आघाडीतून बोहर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Loading...

मात्र प्रकाश आंबेडकरांनी ही शक्‍यता फेटाळून लावतांनाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे आहेत, आणि ते घेतील तो निर्णयच सर्वमान्य असेल. आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, आणि 26 ऑगस्टला आम्ही जागा वाटप अंतिम करू असे स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?