आघाडीविरोधात आंबेडकरांनी फुंकले रणशिंग,’या’ तारखेला होणार ४८ जागांवरील उमेदवारांची घोषणा

prakash-ambedkar

टीम महाराष्ट्र देशा :  आम्ही २२  उमेदवार मागे घेऊ शकत नाही. १५  तारखेला संपूर्ण ४८  जागांचे उमेदवार जाहीर करु असं भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेसबरोबर चर्चेचे सर्व प्रस्ताव संपले आहेत. त्यामुळे काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणं शक्य नाही, अशी घोषणा करीत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीविरोधात दंड थोपटले आहेत. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

भारिप बहुजन महासंघ, एआयएमआयएम तसेच इतर समविचारी संघटनांनी एकत्र येत बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली आहे. परंतु भाजप – शिवसेनेला रोखण्यासाठी आंबेडकर यांना कॉंग्रेस आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु बजन वंचित आघाडीने राज्यात २२ लोकसभा मतदारसंघ देण्याची मागणी केली होती.