प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांची एका महिन्यात घेतली दुसऱ्यांदा भेट,राजकीय चर्चांना उधान

मुंबई : नागरीकत्व दुरूस्ती कायदा हा संपूर्ण देशभरात लागू झाला असून या कायद्याला अजूनही अनेक राज्यातून विरोध दर्शवला जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानावर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आंबेडकर-ठाकरे यांची महिनाभरातील ही दुसरी वेळ आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितले.

Loading...

प्रकाश आंबेडकर हे रविवारी दुपारच्या सुमारास मातोश्रीवर गेले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी २४ तारखेचा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन आंबेडकर यांना केले. तसेच आंबेडकर यांनी देश आर्थिक दिवाळखोरीत असल्याचे वक्तव्य केले होते. त्याची माहिती ठाकरे यांनी जाणून घेतली.

मागील दादर येथे झालेल्या आंदोलनाप्रमाणे २४ तारखेचा बंदही शांततेत पार पडेल अशी ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी दिली. या बंदमध्ये बँक कर्मचारी संघटना, एसटी आणि तेल कंपन्यांच्या संघटनांनी सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण