fbpx

राजकीय, सामाजिक कार्याबद्दल प्रकाश आंबेडकरांचा पॅलेस्टाईन सरकारतर्फे सन्मान

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा सामाजिक आणि राजकीय कार्याबद्दल पॅलेस्टाईन सरकारने सन्मानित केले आहे. पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींच्यावतीने भारतातील राजदूत अदनान अबुल हाईजा यांनी पॅलेस्टीनी दुतावासात प्रकाश आंबेडकरांना गौरवान्वित केले आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पॅलेस्टीनी नागरिक आणि सरकारला बाजूने आहे. पॅलेस्टीनी स्वातंत्र्य लढ्याला आमचा पाठींबा आहे आणि आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहू असं आश्वासन राजदूत अदनान अबुल हाईजा यांना दिले.