fbpx

प्रकाश आंबेडकरांना मिळाली ‘कप बशी’; निवडणूक चिन्ह

prakash aambedkar

टीम महाराष्ट्र देशा – वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडीत सामील न होता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या निर्णयामुळे राज्यात आता तिरंगी लढती पाहायला मिळणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांना अखेर निवडणुकीचे चिन्ह मिळाले आहे. आयोगाने त्यांना ‘कप बशी’ हे चिन्ह दिलंय. निवडणूक लढताना निवडणूक चिन्हाचं मोठं महत्त्व असतं.

प्रकाश आंबेडकर ही लोकसभा सोलापूर आणि अकोल्यातून लढवणार आहेत. त्यामुळे या राज्यात कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात आंबेडकरांना ‘कप बशी’ हे चिन्ह मिळाल्याने आता ते त्याचा प्रचार करणार आहेत.

आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांनी मिळून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती. त्यांना त्यांचं स्वतंत्र निवडणुक चिन्ह नाही. त्यांना आयोगाकडे अर्ज करून चिन्ह घ्यावी लागतात.