प्रकाश आंबेडकरांनी संविधानाला दिली खेकड्याची उपमा

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक येताचं देशात अस्थिरता निर्माण होते. देशाला मोठा धोका असल्याचे चित्र निर्माण केले जाते. मात्र वास्तवात तसे काही नसते. कारण देशाच्या संविधानाने कुठलेही एक जात दुसऱ्या जातीला कैद करणार नाही, अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आपले संविधान हे खेकड्यासारखे आहे, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, पुन्हा आपल्या देशावर बाहेरून राज्य करायला आता कुणीच येणार नाही. कारण म्हणजे देशावर राज्य करायला आधी त्या देशाची आर्थिक नाडी हातात पाहिजे. त्याचप्रमाणे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला बंदुकीचा आणि जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

Loading...

त्यामुळे आता ही आपल्या जातीय व्यवस्थेमधील लढाई असल्याचे यावेळी आंबेडकर म्हणाले. एक जात दुसऱ्या जातीला कैद करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र देशाच्या संविधानाने कुठलेही एक जात दुसऱ्या जातीकडून कैद होणार नाही, अशी व्यवस्था केलेली आहे. म्हणून मी या संविधानाला खेकड्याची उपमा देतो, असेही आंबेडकर म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट