‘लॉकडाऊन ताबडतोब हटवा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन कायदा हाती घेऊ’

prakash aambedkar and uddhav thackeray

पुणे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे.राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र हे प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर चांगलीच आगपाखड केली आहे.

‘राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केलं आहे. मात्र, राज्य सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षापेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच 2019 साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन  राज्य सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन हटावावा आणि खऱ्याअर्थाने अनलॉक करावा. अन्यथा आम्ही 10 ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ’, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

लॉकडाऊनचे नियम मोठे गंमतीशीर आहेत. ते पहिले रद्द करा, माझा इशारा राज्य सरकारला आहे. केंद्रालाही देऊ नंतर असंही आंबेडकरांनी यावेळी सांगितलं. शासन काहीच पावलं उचलायला का तयार होत नाही आहे. या सरकारमध्ये निर्णय क्षमताच नाही तर राज्याचा आर्थिक गाडा नेमका कधी रुळावर येणार?, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –