नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल : आंबेडकर

prakash-ambedkar 1

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवारांवर निशाणा साधत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर जोरदार टीका केली .‘‘शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल. या शॉकमध्ये त्यांना काही झाले तर दोष माझ्यावरच यायचा,’’ असे सांगत पवारांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या सभेत बोलत असताना आंबेडकर म्हणाले, देशात घराणेशाहीचे राजकारण सुरु आहे. लोकशाही फुलवायची तर घराणेशाही संपली पाहिजे. जात, धर्म आणि वर्गाच्या वर्चस्वाच्या मक्तेदारी संपविणे आवश्यक असून जनतेने आपले मत विकू नये. कारण, मत विकत घेणाऱ्या उमेदवाराची बांधिलकी पैसे घेणारांसोबत राहात नाही तर त्याच्यासाठी पैसे लावणाऱ्यासोबत असते.

पुढे आंबेडकर म्हणाले, निवडणूक प्रचार बंद झाल्यानंतर दोन प्रमुख पक्षांकडून नोटांचा प्रचार सुरु होईल. मत विकत घेतले गेल्यामुळेच शहरांचा आणि झोपडपट्यांचा पाणी, वीज या पलीकडे विकास झाला नाही. आपण वंचित राहिलो याला आपणच जबाबदार असून एका दिवसाची दिवाळी करायची की भविष्यकाळ उज्ज्वल करायचा हे आपण ठरवायला हवे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचे फोन करीत असून विधानसभेच्या तिकीटांबाबत आतापासूनच विचारणा होऊ लागली आहे,’’ असा दावा आंबेडकरांनी यावेळी केला.

एवढेच नाही तर, संविधान बदलणाºयांना जागा दाखवून द्या, असे अवाहन डॉ. आंबेडकरांनी केले. सत्ता आल्यास संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना कारागृहात डांबणार असल्याचेही त्यांनी सांगितले.Loading…
Loading...