‘याच्या घरात लग्न नाही मग हे नाचतंय कोणासाठी’? आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमकं कुणासाठी नाचतात, अशी खोचक टीका आंबेकरांनी केली आहे.  ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

दरम्यान, राज ठाकरे हे राज्यभर जाहीर सभा घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणाचे व्हिडीओ दाखून पोलखोल करणाऱ्या राज यांच्या भाषणाची स्टाईल चांगलीच लोकप्रिय होत आहे.

प्रकाश आंबेडकर उभा असलेल्या सोलापूर मतदार संघात देखील राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. मात्र राज ठाकरेंनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यावर बोलण टाळल होत. तरीदेखील प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे. आता यावर मनसेची काय प्रतिक्रिया येते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.Loading…
Loading...