fbpx

मोदी मागासवर्गीय असतील तर त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा : आंबेडकर

prakash aambedkar

टीम महाराष्ट्र देशा : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडी आणि युतीकडून जोरदार प्रचाराचे सत्र सुरु आहे. तर आता या प्रचाराच्या तडाख्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने देखील उडी घेतली आहे. मोदींनी माढ्यातील सभेत ओबीसी असल्याचं म्हटलं होतं, त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला प्रसिद्ध करावा असे आव्हान केले आहे.तसेच तुम्ही १५ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तर ५ वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मात्र, मागासवर्गींयांसाठी काय केलतं असा सवाल देखील त्यांनी यावेळी मोदींना केला.

माढा येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर अकलूज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आयोजित सभेत मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मी मागासवर्गीय असल्याच म्हणतात तर त्यांनी आजपर्यंत मागासवर्गीय लोकांसाठी काय केले? आहे. तसेच ते देशाचे ५ वर्ष पंतप्रधान होते आणि १५ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र, मागासवर्गींयांना काय मिळाल? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. जर मोदी स्वतःला ओबीसी म्हणून घेत असतील तर त्यांनी आपला शाळा सोडल्याचा दाखला प्रसिद्ध करावा असे आव्हान आंबेडकरांनी यावेळी केले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माढ्यातील सभेत बोलताना, मी मागासवर्गीय असल्यामुळेच काँग्रेसने मला जातीवाचक शिव्या दिल्याचं मोदींनी म्हटलं होतं. पण, आता काँग्रेस मागासवर्गीयांना चोर म्हणत असून मी ते सहन करणार नाही, असे म्हणत माढ्यातील सभेत मोदींनी ओबीसी कार्ड वापरले होते. या मोदींच्या वक्तव्याचाच प्रकश आंबेडकर यांनी माढा येथील सभेत समाचार घेतला.