पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण; प्रकाश आंबेडकरांची भाजप-सेनेवर टीका

Prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी भाजप-सेनेवर जोरदार टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पक्षांतरावर भाष्य करताना ‘राष्ट्रवादीतून सुरु असलेले अनेक नेत्यांचे पक्षांतर त्यांच्या चौकशा सुरू झाल्याने होत आहे. या नेत्यांनी तिहारऐवजी भाजपमधील जेलचा स्वीकार केला अस आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांचे सत्ताधारी भाजपमध्ये होत असलेलं पक्षांतर म्हणजे ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे असंही आंबेडकर म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहे. काँग्रेसने या आधी तसंच केलं होतं. आता भाजपकडून तेच चालू आहे. परंतु मी पक्ष फोडणार नाही. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कोणालाही पक्षात देखील घेणार नाही असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज ठाकरेंचं ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा आहे असं आंबेडकर म्हणाले. ईव्हीएमवरील आक्षेपांबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात लढा देणे गरजेचे आहे. राज ठाकरे तसं न करता केवळ आंदोलन करणार असतील तर तो पळपुटेपणा ठरेल असही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सहकारमंत्र्यांच्या ‘लोकयात्री सुभाष देशमुख’ या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन

भाजप हा शिवसेनेलाही संपवणार : जयंत पाटलांचा आरोप

हाऊसफुल्लचा बोर्ड असला तरी १० तिकीटं असतातच : पाटील