‘भाजपच्या मागे जाणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे’

टीम महाराष्ट्र देशा;- राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे.याच पार्श्वभूमीवर बुधवारी अकोला क्रिकेट मैदानावर भारतीय बौद्ध महासभेने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन केले होते.

यावेळी आंबेडकर बोलताना म्हणाले, भाजपच्या मागे जाणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे,मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते, असे वक्तव्य करत त्यांनी भाजप वर जोरदार टीका केली. आंबेडकर यांनी यावेळी भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांविषयी संताप व्यक्त केला.

तसेच भाजप आणि काँग्रेसमध्ये साटेलोटे असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल असताना त्यांना अटक कशी होत नाही? यामध्ये भाजप-काँग्रेसमध्ये साटलोटे आहे का?, असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच आपण केलेल्या कामाची पोचपावती पोहचविण्यासाठी नेते मंडली चांगलेच सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

महत्वाच्या बातम्या