‘आरे कॉलनीत वृक्षतोड करुन भाजप – शिवसेनेचा जागा हडपण्याचा डाव’

टीम महाराष्ट्र देशा:- मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेड साठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे. या वृक्षतोडीचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या नावने वृक्षतोड करुन जागा हडपण्याचा डाव आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आंबेडकर म्हणाले भाजपा, शिवसेना सरकारला इथली जागा हडप करायची आहे. एवढंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही स्वार्थ यामध्ये आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना वरवर विरोध करत आहे. मात्र ही सगळी नाटकं आहेत.इतकंच नाही तर मेट्रो कारशेडच्या नावे या सगळ्यांना इथली जागा हडप करायची आहे असाही आरोप त्यांनी केला. येत्या निवडणुकीत आता जनताच त्यांना उत्तर देईल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज आरे वृक्षतोडीच्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. पवई फिल्टरपाडा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी दुपारी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःला अटक करवून घेतली.

महत्वाच्या बातम्या