मी भाजपच्या घोड्याला लगाम घालणार – प्रकाश आंबेडकर

blank

टीम महाराष्ट्र देशा:-राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे शेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांच्या प्रचारासाठी आले होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजपला सत्ता राबवता येत नाही. भाजपचा घोडा सध्या उधळला आहे. त्याला लगाम घालण्यास दोन्ही काँग्रेस अपयशी ठरली आहे. भाजपच्या या उधळलेल्या घोड्याला वंचित बहुजन आघाडीच लगाम घालून वठणीवर आणेल अशी टीका आंबेडकर यांनी भाजपवर केली.

पुढे म्हणाले,महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप-शिवसेनेशी युती करून महात्मा गांधींच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. आतापर्यंत तुम्ही प्रस्थापितांना सत्ता दिली, एकदा विस्थापितांना संधी द्या, असं आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केलं.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीकडून पाडापाडीचं राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी राष्ट्रवादीवाले विरोधी उमेदवारांना मदत करत असल्याचा दावाही यावेळी  आंबेडकरांनी केला.

राष्ट्रवादीने त्यांच्या जाहीरनाम्यात सर्वांना मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र सर्वांना मोफत शिक्षण दिल्यास त्यांच्याच ताब्यातील शिक्षण संस्थांचे काय होईल, याची त्यांनाच भीती निर्माण झाल्याचं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या