आरक्षणाची फाईल म्हणजे चिक्कीची फाईल नाही; प्रकाश आंबेडकरांनी उडवली पंकजा मुंडेंची खिल्ली

नंदूरबार : आरक्षणाची फाईल म्हणजे चिक्कीची फाईल नव्हे. आरक्षणाबाबत असा एका मिनिटात निर्णय आणि सही होत नसते असं म्हणत भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. नंदूरबार येथे बोलताना आंबेडकर यांनी हि टीका केली आहे.

मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर असती तर एका तासात त्यांना आरक्षण दिले असते असं वक्तव्य मुंडे यांनी परळीत मराठा आंदोलकांशी बोलताना केले होते. पंकजा मुंडेचे ते विधान बालिशपणाचे आहे, आरक्षणाच्या फाईलवर अशी एका मिनिटात सही किंवा निर्णय होत नसतो. आरक्षणाची फाईल म्हणजे चिक्कीची फाईल नाही,. असा उपहासात्मक टोलाही आंबेडकर यांनी पंकजा मुंडेंना लगावला.

दरम्यान,मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर सौ. पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. असा चिमटा शिवसेनेचे मुखपत्र असलेला सामना दैनिकातून काढण्यात आला आहे.

Rohan Deshmukh

राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळेंना उमेदवारी मिळाल्यास आघाडी करणार नाही – प्रकाश आंबेडकर

मोदींच्या काळात संविधान धोक्यात : शरद पवार

Latur Advt
You might also like
Comments
Loading...