कोरेगाव भीमाप्रकरणी सरकारची कारवाई एकतर्फी असल्याचा आंबेडकरांचा आरोप

सरकारने आपली ही दमननीती त्वरित थांबवावी - प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव भीमाप्रकरणी राज्य सरकारची कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी लातुरात पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलल्याप्रमाणे कृती करत नाहीत. कोरेगाव भीमाप्रकरणी हे सरकार अगदी एकतर्फी कारवाई करत असल्याचे पाहावयास मिळते. त्या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासन व प्रशासन करीत असल्याचा आरोप करून सरकारने आपली ही दमननीती त्वरित थांबवावी अन्यथा लोक सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत असेही ते म्हणाले.

Bhima koregaon

केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र

मोदी सरकारचा अर्थसंकल्प विश्वास ठेवण्याजोगा नाही. केंद्राच्या बजेटमध्ये एससी, एसटी प्रवर्गासाठी निधीची तरतूद ३० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे सांगून अशा प्रकारची कृती करून हे सरकार सर्वच क्षेत्रात खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. सरकारच्या या नीतीला कंटाळलेली जनता भविष्यात नवीन पर्याय शोधेल. हे पर्याय देशपातळीवर वेगवेगळे असतील.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल

राज्यातील जवळपास ८२ तालुक्यांना गारपिटीचा फटका बसला असून गारपिटग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत नाममात्र आहे. शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारसह शासकीय अधिकाऱ्यांचे धोरणही सातत्याने उदासीन आहे . यास दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मात्र अपवाद होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात ताबडतोब शासकीय अध्यादेश काढून शेतकऱ्यांना भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले होते. राज्यातील फडणवीस सरकारनेही त्याचा आधार घेऊन त्वरित नवा अध्यादेश काढायला हवा.

You might also like
Comments
Loading...