‘शरद पवार आणि अशोक चव्हाण हे शेतकऱ्यांचे नेते नाही, तर कारखान्यांचे मालक’

टीम महाराष्ट्र देशा : ‘शरद पवार आणि अशोक चव्हाण हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत, तर ते कारखानदारांचे मालक आहेत. त्यांना शेतकऱ्याचं काहीही पडलेलं नाही. ते फक्त शेतकऱ्यांच्या मालाची लूट कशी करता येईल, हेच पाहतात’ असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर चांगलाच शाब्दिक निशाणा साधला. भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेने 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्ममेळाव्यात आंबेडकर बोलत होते.

पुढे आंबेडकर बोलताना म्हणाले, आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते? घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी पाजता येत नाही. लुटणाऱ्या नेत्यांना ओळखा आणि निवडणुकीत योग्य निर्णय घ्या, असे म्हणत आंबेडकर यांनी उपस्थितांना या निवडणुकीत योग्य निर्णय घेण्याचंही आवाहन केले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच आपण केलेल्या कामाची पोचपावती पोहचविण्यासाठी नेते मंडली चांगलेच सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

महत्वाच्या बातम्या