fbpx

प्रकाश आंबेडकरांनी भाजपची सुपारी घेतली, सुशीलकुमार शिंदेंची आंबेडकरांवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर शिंदे जोरदार टीका केली आहे

काँग्रेसची मतं कापून भाजपला फायदा मिळावा अशी सुपारी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांवर तोंडसुख घेतले आहे,. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. तसेच एमआयएमसोबत एकत्रित येताना तुमची तत्वं कुठे गेली? असा सवाल देखील सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला. प्रकाश आंबेडकरांची आघाडी म्हणजे ‘वोट कटवा’ आघाडी असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, सोलापुरात यावेळी तिरंगी लढत होत आहे. भाजपतर्फे जयसिद्धेश्वर शिवाचार्य, कॉंग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर मैदानात आहेत.