fbpx

मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा ; आंबेडकरांची मोदींवर टीका

prakash-ambedkar 06

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे. या प्रचारादरम्यान नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. आज बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

मोदींवर टीका करताना त्यांनी पंतप्रधान मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा, त्यांना सत्तेतून खाली खेचा असं विधान केले आहे. तसेच मोदींनी नोटबंदी करुन व्यापाऱ्यांना लुटले. त्यामुळे व्यापार बुडला, असा आरोप करत, प्रकाश आंबेडकरांनी मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचं आव्हान केलं.

मोदींनी नोटबंदी कशी केली? हा अधिकार मोदींना कोणी दिला? कारण नोटांवर जर गव्हर्नरची सही आहे, तर नोटांची सर्व मालकीही गव्हर्नरची असायला हवी. कोणत्याही नोटा बदलून देण्याचे काम हे त्यांचेच आहे. मग मोदी कशी काय नोटबंदी करू शकतात? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, हे सरकार शेतकऱ्यांचे नसून फक्त कारखानदारांचे आहे असा हल्लाही त्यांनी सरकारवर चढवला.