कॉंग्रेस गाढवांचा पक्ष, भेटीच राजकारण करणार हे माहित होत – आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा: सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जोरदार लढत होत आहे, कॉंग्रेस भाजपच्या पारंपारिक लढतीमध्ये वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी चुरस निर्माण केली आहे. दरम्यान, शनिवारी प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने मतदारसंघात चर्चांना उधान आले आहे.

शनिवारी सोलापूरमधील पंचतारांकित हॉटेल बालाजीमध्ये झालेल्या शिंदे – आंबेडकर भेटीच फोटो सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये आता कॉंग्रेस हा गाढवांचा पक्ष असून, कोणाला तरी भेटून फोटो व्हायरल करायचे डावपेच ते खेळतात, मात्र राजकारणात मी कोणालाही कायमचा दुश्मन मानत नाही, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
कशी झाली प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमारांची भेट

प्रकाश आंबेडकर हे 10 एप्रिल पासून बालाजी हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत, तर शनिवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर याच हॉटेलमध्ये थांबले होते. शिंदे हे पाटील यांना भेटायला आले, यावेळी प्रकाश आंबेडकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह नाश्ता करत होते. आंबेडकर याच हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने शिंदे यांची जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनीसोबत एकत्र नाश्ता केल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, या भेटीचे कॉंग्रेसकडून राजकारण करण्यात येत असल्याची टीका आंबेडकर यांच्याकडून करण्यात आली आहे.Loading…
Loading...