बिल्डरांना काश्मिरातील जागा विकण्यासाठी 370 रद्द करण्याचा खटाटोप – आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मोदी सरकारने रद्द केले आहे. हे कलम हटवत जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहे. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.

काश्मीरमध्ये उद्योगपती आणि बिल्डरांना काश्मिरातील जागा विकण्यासाठी सरकारने खटाटोप केला आहे, कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही नसून हुकूमशाही सुरू आहे, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला हे. माढा तालुक्यातील अरण येथे माळी समाजाच्या सत्तासंपादन मेळाव्यावेळी आंबेडकर बोलत होते.

संविधान बदलून आरक्षण बंद करण्याचा आरएसएसचा डाव आहे. बहुजन समाजातील सर्व जाती जमाती एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे, तरंच वंचित घटकांची सत्ता येईल हा समाज सत्ताधारी बनेल, असेही आंबेडकर म्हणाले.