सरकारने ‘ते’ संभाषण जनतेसमोर आणावं – प्रकाश आंबेडकर

मुंबई : वारीत साप सोडणार असल्याचं बड्या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती लागल्याचं चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलं होतं. त्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येतं होती. संभाषण हाती लागलं असल्यास चंद्रकांत पाटील यांनी ते सादर करावं अशी मागणी देखील अनेक नेत्यांकडून करण्यात येत होती.

दरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांनी या वादात उडी घेतली असून, सरकार साफ खोट बोलत आहे. अशी कोणतीही संभाषणाची क्लिप सरकारला मिळालेली नाहीये. जर वारीत साप सोडण्याविषयीची संभाषणाची क्लिप सरकारला मिळाली असेल, तर त्यांनी ती जनतेसमोर आणावी असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

काल खासदार संभाजीराजे यांनी देखील चंद्रकांत पाटलांनी त्या संभाषणाची क्लिप उघड करावी अशी मागणी केली होती. यावेळी बोलताना संभाजीराजे भोसले म्हंटले होते की, अशी विकृत कल्पना मराठयांच्या मनात येणे कदापी शक्य नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे. वारीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. मात्र वारीच्या इतिहासात असं कधी झालं नाही. सरकार खोटं तर बोलतं नाहीयेना, हे सिद्ध करण्यासाठी ती संभाषणाची क्लिप जनतेसमोर आणावी.

कामगारांसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्यात भ्रष्टाचार; सीबीआयमार्फत चौकशी करा – अजित पवार

काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी