देशात दंगली घडवण्याचा सरकारचा अजेंडा – प्रकाश आंबेडकर

पुणे : देशात अस्वस्थता निर्माण करुन दंगली घडवण्याचा सरकारचा अजेंडा आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीये. आरक्षण संपवण्यासाठी यज्ञ सुरू आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही, असा सवालही आंबेडकरांनी केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भटक्या विमुक्त जातींच्या सत्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

गेल्या वर्षी 20 डिसेंबरला कोरेगाव मधील मशीद जाळली, त्याचा अद्याप तपास नाही. या सरकारचा अजेंडा दंगली घडवणे हा आहे, मध्यप्रदेशात आरक्षण संपवण्यासाठी बजरंग दल, आरएसएसवाले 51 ठिकाणी यज्ञ करण्यात येत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही असा थेट आरोप प्रकाश आंबेडकरांनी भाजप सरकारवर केला आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचारदरम्यान मशीद जाळण्यात आली. कदाचित यातून जातीय हिंसाचार उफाळेल अशी त्यांची अपेक्षा होती, पण मुस्लिमांनी तक्रार दिली नाही. म्हणून ते आता आरक्षणाच्या पाठीमागे लागले आहेत. या सरकारला देशात दंगली घडवायच्या आहेत. हा त्यांचा अजेंडा आहे. जर दंगली झाल्या तर आणीबाणी लादता येईल आणि शांतता होत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही. आणि त्याचा फायदा सरकारला होईल, असा आरोप प्रकाश आंबेडकर केला आहे.

You might also like
Comments
Loading...