मुस्लिमांवरील हल्ल्याने आंबेडकर आक्रमक, मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने सरकारनेच दिल्याचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिमांवरील वाढत्या हल्ल्यासाठी सरकारला दोषी ठरवत निशाणा साधला आहे. मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने सरकारनेच दिले आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

देशात मुस्लिमांवर जे हल्ले होत आहेत त्याचे प्रमाण वाढत आहे. आणि मोदी सरकार जमावाकडून होणारे हल्ले रोखण्यास कमकुवत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने सरकारनेच दिले आहेत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

याचबरोबर मॉब लिंचिंगच्या घटना खास करून मुस्लिमांच्या विरोधात होत आहेत. त्यामुळे या अत्याचारांना अल्पसंख्याकांवरील हल्ले न म्हणता मुस्लिमांवरील हल्ले म्हणायला हवेत, असेही त्यांनी म्हंटले. तसेच बुद्धीभेद करण्यासाठीच अल्पसंख्यांक हा शब्द वापरला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.