fbpx

प्रकाश आंबेडकरांनी रामदास आठवलेंची तुलना केली कुत्र्या-मांजरासोबत

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल बोलत असताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घणाघाती टीका केली आहे. आंबेडकरांना औवेसी चालतात मात्र ते रिपबल्कीन पक्षातील नेत्यांशी बोलत नाहीत, अशा शब्दात आठवलेंनी आमेद्कारांवर निष्ण साधला होता. त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता आंबेडकरांनी आठवलेंवर सनसनाटी टीका केली आहे. मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत नसतो, अशा शब्दात आंबेडकर यांनी टीका केली.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आगामी लोकसभा निवडणूकासंदर्भात बोलताना रामदास आठवलेंना प्राण्यांच्या उपमा देत टीका केली आहे. रामदास आठवलेंची तुलना करताना चक्क कुत्र्या-मांजरांशी बोलत नसल्याचे ते म्हणाले.आम्ही कुणाच्याही मागे जात नाही, आमची आणि एमआयएम पक्षाची युती लोकसभा निवडणुकीनंतरी कायम राहणार असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केले.

आम्ही कुणाच्याही मागे जात नाही, आमची आणि एमआयएम पक्षाची युती लोकसभा निवडणुकीनंतरी कायम राहणार असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.आगामी निवडणुकीत आम्ही आरएसएसला एक नंबरचा शत्रू समजत असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, रामदास आठवलेंसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत नसल्याचे म्हटले. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यातील हाडवैर पुन्हा एकदा समोर आले आहे.

2 Comments

Click here to post a comment