‘तीन दिवसात काहीही गडबड होऊ शकते, दुसऱ्याचं दिवशी मतमोजणी घ्या’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणी यामध्ये ३ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे या तीन दिवसात गडबड होऊ शकते त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मतमोजणी घावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे याचे आम्ही स्वागतच करतो. पण मतदान आणि मतमोजणी यांच्यात तीन दिवशांचे अंतर आहे. या तीन दिवसात काहीही गडबड केली जाऊ शकते. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करून मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी करण्याची मागणी करणार आहे असं आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही निवडणुकीच्या कार्यक्रमावर शंका व्यक्त केली होती. त्यांनी ईव्हीएमबाबत सुरुवातीपासून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे अशातच मतदान आणि मतमोजणी यामध्ये 3 दिवसांचे अंतर का? या दिवसांमध्ये काही गडबड करायची आहे का? अशी शंका लोकांमध्ये सुरु आहे. या 3 दिवसांच्या काळात काहीही होऊ शकते असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...

Loading...