२०१९ नव्हे तर कॉंग्रेसने २०२४ ची तयारी करावी- प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar 1

मुंबई : देशाच्या राजकारणात विरोधकांमध्ये काँग्रेसपेक्षा तिसऱ्या आघाडीला अधिक स्पेस असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 2019 नाहीतर 2024ची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे . आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे भाजपशी दोन हात करण्यासाठी निघालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिडालाच भोकं पडल्याची चिन्हं दिसत आहेत.

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांपाठोपाठ काँग्रेसवरही शरसंधान साधलंय. 2019साली कोणासोबत जायचं याचा निर्णय कर्नाटक इलेक्शननंतरच घेणार असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी आपला कल हा काँग्रेससोबत नाहीतर डाव्या आघाडीसोबत जाण्याच्या बाजूने असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.

देशाच्या राजकारणात विरोधकांमध्ये काँग्रेसपेक्षा तिसऱ्या आघाडीला अधिक स्पेस असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 2019 नाहीतर 2024ची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे. भाजप आणि आरएसएस हे आपले प्रमुख विरोधक असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेही आपले अजिबात मित्र नाहीत, हे सांगायलाही आंबेडकर विसरले नाहीत.Loading…
Loading...