मराठा समाजाचे मतदान राष्ट्रवादीकडे वळल्याने भाजपच्या मतांमध्ये घट – आंबेडकर

blank

टीम महाराष्ट्र देशा :- आज संपूर्ण राज्यात २८८ जागांसाठी मतदान होत आहे. अनेक नेते सकाळी बाहेर पडून मतदान करत आहेत.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मिळणारे मराठा समाजाचे मतदान काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळले आहे. यामुळे भाजपच्या मिळणारे मतदान कमी होणार आहे. असे असले तरी आमची थेट लढत ही भाजपसोबत असणार असा पुनरुच्चार त्यांनी केला.

आंबेडकर म्हणाले की, जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहता आम्हाला आशादायक निकाल लागण्याची अपेक्षा आहे. भाजप-सेना यांनी युती केली असली तरी त्यांच्यात म्हणावे तसे जुळत नाही. याचा नक्कीच फायदा होणार असा विश्वास आंबेडकर यांनी यावेळी बोलुन दाखवला.

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

महत्वाच्या बातम्या