कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय – प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar 06

कराड : सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे. पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय. काँग्रेस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील, याची वाट बघत बसले असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी कोल्हापूरहून साताऱ्याला जात असताना कराडमध्ये थांबून काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.यावेळी त्यांनी कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर निशाना साधलाय.तसचं सर्व विरोधी पक्षांनी भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हंटले आहे.