भारताचा पाकिस्तान करायचा असल्यास उदयनराजेसारख्यांना निवडून द्या : प्रकाश आंबेडकर

नगर : भारताचा पाकिस्तान करायचा असेल तर आगामी काळात उदयनराजे भोसले यांच्यासारखी माणसे निवडून द्यावीत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी कोपरगावमध्ये लगावला.

कॉग्रेस व भारतीय जनता पक्ष हे दोन्हीही पक्ष एकाच माळेचे मनी आहेत. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे आगामी काळात सत्ताधाऱ्यांची अवस्थाही कॉग्रेससारखीच होईल, असे सांगून ऍड. आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांवर टीका केली. जनतेच्या नोटा रद्द केल्याने आता जनतेनेही पेटून उठावे.  त्यासाठी मोर्चे, आंदोलने करावीत. एकीकडे हे बजेट दीडपट शेतकऱ्यांसाठी आहे, हे वास्तव असले, तरी शेतकऱ्यांच्या पदरात ज्या वेळी खऱ्या अर्थाने शेतीमालाला चांगला भाव मिळेल, त्याच वेळी मोदी सरकारचा विश्वास सार्थ ठरेल असे आंबेडकर म्हणाले.

You might also like
Comments
Loading...