बारामती मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला अल्प प्रतिसाद

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभेचे मतदान पार पडताच राज्यामध्ये सभांचा धडाका लावला आहे, वंचितकडून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी जाण्याचे नियोजन त्यांच्याकडून करण्यात आले आहे, सोलापूरमध्ये हजारोंची गर्दी जमवणाऱ्या वंचित आघाडीला इतर ठिकाणी मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळताना दिसत नाही, आज बारामती लोकसभा मतदारसंघातील सभेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

Loading...

बारामती लोकसभा मतदारसंघ पवार घराण्याचा गड मानला जातो, मात्र यंदा भाजपने कांचन कुल यांच्या रूपाने राष्ट्रवादी समोर तगडे आव्हान दिले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुल यांच्या प्रचारासाठी जंगी सभा घेतल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून नवनाथ पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पडळकर यांच्या प्रसारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे वडगाव बुद्रुकमधील शिंदे मैदानावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत नागरिकांनी हजेरी लावली होती.

यावेळी बोलताना आंबेडकर यांनी भाजप तसेच राष्ट्रवादीतील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादी निवडणुकीआधी काडीमोड घेते आणि निवडणुकीनंतर गंधर्व विवाह करत भाजपला जवळ करते. तसेच राष्ट्रवादीकडून आम्हाला भाजपची बी टीम म्हणून संबोधले जाते. मात्र यांना असे बोलताना लाज देखील वाटत नाही. अशी टीका त्यांनी केली आहे.
बारामती लोकसभेच्या भाजप उमेदवार कांचन कुल आणि आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या नातेवाईक असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याचं नात जनतेला सांगाव, असे आव्हान आंबेडकर यांनी केले आहे.Loading…


Loading…

Loading...