fbpx

प्रकाश आंबेडकर यांनी दिले काँग्रेसबरोबर युतीचे संकेत

Prakash ambedkar

मुंबई-  आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करण्याचे संकेत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत मात्र युती करण्याआधी त्यांनी एक अट ठेवली आहे. ती अट जर कॉंग्रेसने पूर्ण केली तरच युती होईल असं देखील ते म्हणाले आहेत.

एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार,भाजप सरकारवर कडाडून टीका करणारे भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र युती करण्याआधी त्यांनी एक अट ठेवली आहे. ती अट म्हणजे या महिन्यात होणाऱ्या भंडारा पोटनिवडणुकीत भारिपच्या उमेदवाराला कॉंग्रेसने पाठिंबा देण्याबाबत आहे. भंडारा पोटनिवडणुकीत भारिपच्या उमेदवाराला कॉंग्रेसने पाठिंबा द्यावा असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर आंबेडकर रिपब्लिकन राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये दलित मते मिळविण्यासाठीत्यांच्या पक्षाबरोबर युती करण्याची काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत आहे. या संदर्भात आंबेडकर यांना विचारले असता, आगामी लोकसभा निवडणुकीत युतीस तयार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत समझोता करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

1 Comment

Click here to post a comment