सरकारचे तोंड राफेल विमान घोटाळ्यामुळे काळे झाले : आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा- आमचे हात कोणत्याही घोटाळ्यात अडकलेले नाही असा दावा करणाऱ्या सरकारचे तोंड राफेल विमान घोटाळ्यामुळे काळे झाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केली.वंचित बहुजन आघाडीची विराट सभा सोलापुरातील पार्क मैदानावर पार पडली त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
न खाऊंगा न खाने दुंगा म्हणणारे मोदी सरकार एक दुसऱ्याला खाऊ घालत आहेत. काँग्रेसवाले सरळ सरळ खात होते. आमचे हात कोणत्याही घोटाळ्यात अडकलेले नाही असा दावा करणाऱ्या सरकारचे तोंड राफेल विमान घोटाळ्यामुळे काळे झाले आहे.