तर लोकशाही न मानणाऱ्यानांही सोबत घेवू – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा: लोकशाही न मानणाऱ्या लोकांनीही हिंसेचा मार्ग सोडल्यास त्यांना सोबत घेणार असल्याची भूमिका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. एबीपी माझा वृत्त वाहिनीशी ते बोलत होते.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या संभाजी भिडे आणी मिलिंद एकबोटेंवर पोलीस कारवाई करतील याबद्दल आशावादी असल्याच त्यांनी यावेळी सांगितले तर राज्यामध्ये काही लोकांकडून दलितविरुद्ध मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा घणाघातही आंबेडकर यांनी केला आहे.