fbpx

‘काँग्रेस आणि भाजपचे नाते काय, ते मला चांगले ठाऊक आहे’

Prakash ambedkar

पुणे- ‘जागावाटपात बारा जागा मागितल्या तरी चर्चा होत नाही. मनूवाद रोखण्यात त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे संविधानाचे रक्षण करून सत्तेत जाण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे’, असे आवाहन करतानाच ‘समझोता झाला तर ठीक, नाही झाला तर आम्ही सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित ‘संविधान सन्मान सभे’त आंबेडकर बोलत होते.’देशातील वंचित विधानसभेत, संसदेत गेलाच पाहिजे’, या भूमिकेचा पुनरुच्चार करून आंबेडकर म्हणाले, ‘सत्तेत वाटेकरी नको, म्हणून जागावाटपाबाबत बोलायला तयार होत नाहीत. भाजपला मदत करता, असा प्रचार वंचित बहुजन आघाडीबाबत केला जातो. मात्र, काँग्रेस आणि भाजपचे नाते काय, ते मला चांगले ठाऊक आहे. धर्मनिरपेक्षतेचा ठेका आपणच घेतला, असे काँग्रेसला वाटते. मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका झाल्यावर तुमचा खरा रंग बाहेर काढीन’, असा टोलाही आंबेडकरांनी लगावला.